तुम्हालाही लागणार म्हाडाची लॉटरी; शिंदेंची मोठी घोषणा..!

मुंबई : तुम्ही मुंबई पुण्यात म्हाडाचे घर (Mhada Flat) घेण्याचा विचार करत असाल तर आता ते स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे आता अनेकांना म्हाडाची घरे घेण्याची संधी मिळणार आहे. चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती..

घरांच्या किंमती दिवसेंदिवस आकाशाला भिडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसासाठी घर खरेदी करणे अधिकच कठीण झाले आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) यांच्या माध्यमातून किफायतशीर दरात घरे (Affordable flats) उपलब्ध करून दिली जात आहेत, जेणेकरून सामान्य नागरिकालाही महानगरात स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करता येईल. शनिवारी म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे घरांच्या विक्रीसाठी लॉटरीचे आयोजन करण्यात आले, ज्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. काल काढलेल्या म्हाडाच्या लॉटरीत अनेकांना म्हाडाची घरे लागली. या प्रसंगी एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्यांसाठी अजून एक मोठी घोषणा केली आहे.

भाड्याने मिळणारी घरे उभारणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले की महाराष्ट्र सरकार पुढील पाच वर्षांत विविध यंत्रणांच्या माध्यमातून जसे की म्हाडा, सिडको, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) आणि प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाई) यांच्या सहकार्याने मुंबई महानगर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर किफायतशीर घरे बांधण्याची योजना आखत आहे. या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी, कामकाजी महिलांसाठी वसतिगृहे तसेच भाड्याने मिळणारी घरे उभारली जाणार आहेत.

येथे वाचा – खुशखबर! या लोकांना लागली म्हाडाची लॉटरी, येथे पहा यादी..!

म्हाडा उभारणार 8 लाख घरे

पुढील पाच वर्षांत खाजगी आणि शासकीय संस्थांच्या माध्यमातून गृहनिर्माण क्षेत्रात सुमारे 50 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे आणि अंदाजे 35 लाख घरे बांधली जाणार आहेत. केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर (GST) मध्ये केलेल्या कपातीमुळे घरांच्या बांधकामाचा खर्च कमी होण्यास मदत झाली असून, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एमएमआर ग्रोथ हबचे उद्दिष्ट आहे की 2030 पर्यंत मुंबई महानगर प्रदेशात एकूण 35 लाख घरे उभारण्यात यावीत. त्यापैकी जवळपास 8 लाख घरे थेट किंवा अप्रत्यक्षपणे म्हाडाच्या माध्यमातून (MHADA) उपलब्ध करून दिली जाणार आहेत. सरकार मोठ्या प्रमाणावर सामुदायिक पुनर्विकास प्रकल्प राबवून मुंबई आणि आसपासच्या महानगर क्षेत्रात घरांची उभारणी करण्याचा प्रयत्न करत आहे.

येथे वाचा – म्हाडाची जाहिरात आली; आता फक्त 18 लाखात घर, पहा घरांचे लोकेशन..!

म्हाडाचे उपाध्यक्ष काय म्हणाले?

म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जायसवाल यांनी सांगितले की बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प, सायन कोळीवाड्यातील सिंधी शरणार्थ्यांच्या 25 इमारतींचा पुनर्विकास, कमाठीपुरा पुनर्विकास प्रकल्प, अभ्युदय नगर (काळाचौकी) म्हाडा कॉलनी समूह पुनर्विकास, गोरेगावमधील मोतीलाल नगर कॉलनी पुनर्विकास, सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) पुनर्विकास प्रकल्प, अंधेरीतील सरदार वल्लभभाई पटेल नगर समूह पुनर्विकास प्रकल्प, बांद्रा रिक्लमेशन आणि आदर्श नगर (वरळी) म्हाडा प्रकल्प, तसेच जोगेश्वरी पीएमजीपी पूनम नगर पुनर्विकास प्रकल्प या माध्यमातून पुढील पाच वर्षांत सुमारे 2 लाख घरे उपलब्ध होणार आहेत. तसेच एमएमआर ग्रोथ योजनेअंतर्गत 2030 पर्यंत म्हाडाच्या माध्यमातून सुमारे 8 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत जवळपास वीस हजार गिरणी कामगारांना घरे देण्यात आली आहेत.

येथे पहा – दिवाळीत घ्या म्हाडाचे घर; दोनशे घरांची संधी, म्हाडाचा दिवाळी स्पेशल सेल..!

24 thoughts on “तुम्हालाही लागणार म्हाडाची लॉटरी; शिंदेंची मोठी घोषणा..!”

Leave a Comment

Join WhatsApp Group