म्हाडाची जाहिरात आली; आता फक्त 18 लाखात घर, पहा घरांचे लोकेशन..!

Mhada Flats : म्हाडाची घरांची नवी जाहिरात अखेर प्रसिद्ध झाली आहे. आता स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्‍याची सुवर्णसंधी मिळाली आहे. अनेक दिवसांपासून म्हाडाच्या घरांच्या जाहिरातीबाबत विचारणा केली जात होती. आता अखेर म्हाडाची नवी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे एन दिवाळीच्या तोंडावर घराचे स्वप्न पूर्ण होण्याची संधी मिळणार आहे. मुंबई पुण्यात दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर घर घेण्याचा मोठा ट्रेंड आहे. त्यामुळे लोक म्हाडा लॉटरीच्या जाहिरातीची प्रतीक्षा करत असतात. आता अखेर म्हाडाच्या घरांची जाहिरात आलेली असून फक्त 18 लाखात घर उपलब्ध झालेले आहे. विशेष म्हणजे हे घर विना लॉटरी मिळणार आहे. त्यामुळे आता या घरांबाबत जाणून घेण्याची उत्सुकता तुमची नक्कीच वाढली असेल. चला या घरांचे लोकेशन कुठे आहे? आणि यासाठी कोण पात्र आहे? याची माहिती जाणून घेऊया.

पहा घराचे लोकेशन

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून तळेगाव दाभाडे (ता. मावळ, जि. पुणे) या ठिकाणी असलेल्या “प्रधानमंत्री आवास योजना” अंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी 269 एवढ्या रिक्त सदनिकांची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. ही घरे “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्वावर उपलब्ध होणार असून अर्ज प्रक्रिया 10 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत सुरू राहणार आहे.

येथे पहा – दिवाळीत घ्या म्हाडाचे घर; दोनशे घरांची संधी, म्हाडाचा दिवाळी स्पेशल सेल..!

या योजनेत अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त आणि भटक्या जमातींसह सर्वसाधारण प्रवर्गासाठीही घरे राखीव ठेवण्यात आली आहेत. प्रत्येकी सदनिकेची विक्री किंमत 20.46 लाख असून, केंद्र व राज्य शासन अनुदान वजा केल्यानंतर अर्जदारास केवळ 18.15 लाख रक्कम भरावी लागेल. सदनिकेचे क्षेत्रफळ 48.96 चौ.मी. असून, अर्जाची किंमत 600 रुपये (+GST) आहे.

येथे पहा – दिवाळीत घ्या म्हाडाचे घर; दोनशे घरांची संधी, म्हाडाचा दिवाळी स्पेशल सेल..!

घरासाठी पात्रता काय?

अर्जदार भारतीय नागरिक असावा, त्याचे वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा कमी असावे आणि त्याच्या नावावर कुठेही पक्के घर नसावे. त्यासोबतच प्रधानमंत्री आवास योजनेच्या घटक तीन मध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे, अशा काही अटी आहेत. महत्वाचे म्हणजे घर घेऊ इच्छिणाऱ्यांनी अर्जाचे फॉर्म पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, गृह निर्माण भवन, आगरकर रोड, पुणे-411001 याठिकाणी अर्ज  मिळणार आहे.

33 thoughts on “म्हाडाची जाहिरात आली; आता फक्त 18 लाखात घर, पहा घरांचे लोकेशन..!”

  1. I L. U. Girsaole 67 yrs. Retired from Coal India, urgent in need a home in Pune or in Mumbai, pl. Kindly arrange to help for the same.
    Thanking You !

    Reply
  2. कृपया मलाही घर घ्यायच आहे म्हाडाचे तर त्यासाठी मला काय करावे लागेल तेव्हढे सांगा

    Reply
  3. ठाणे मध्ये काही असेल तर kle का मला ही . घ्यायचं आहे .

    Reply
  4. आम्हाला पण स्वतःच्या घराची गरज आहे म्हाडा चे procedure काय आहे pliz

    Reply
  5. म्हाडाचे घर घ्यायचे आहे कृपया पुढील प्रोसिजर विषय कळवावी धन्यवाद

    Reply

Leave a Comment

Join WhatsApp Group