MHADA Lottery 2025 : घर घ्यायचं आहे पण बजेट हातात बसावं असंही वाटतंय? मग हा म्हाडाचा 1.5 BHK फ्लॅट नक्की पाहा.. प्रशस्त हॉल, वेंटिलेटेड बाल्कनी आणि शांत परिसर असं सगळं काही आहे इथे. सगळ्यात खास म्हणजे म्हाडाच्या या घरांची किंमत खूपच परवडणारी आहे. मित्रांनो, आजकाल 1.5 BHK फ्लॅटसाठी इतकी परवडणारी किंमत क्वचितच मिळते. आणि जर तुम्हाला 1 BHK हवा असेल, तर तो तर अजूनच कमी किंमतीत उपलब्ध आहे. लोकेशन पण जबरदस्त आहे. रोजच्या प्रवासासाठी सोयीचं, शाळा, बाजार, आणि बसस्टॉप हे पण जवळ आहे. या घरांसाठी अर्ज केल्यास याठिकाणी घरं लागण्याचे चान्सेस जास्त असल्याचं एका युट्युबरने आपल्या व्हिडीओमध्ये सांगितले आहे. या योजनेसाठी अर्जाची तारीख 11 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली असून अंतिम अर्जाची तारीख 31 ऑक्टोबर 2025 आहे. चला जाणून घेऊया लोकेशन, अर्ज प्रक्रिया आणि इतर संपूर्ण माहिती..
म्हाडाचा 1.5 BHK फ्लॅट माहिती
पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात मरुंजी येथे म्हाडाने 814-A व 814-B अशीआना निवास हा आकर्षक हाऊसिंग प्रकल्प उभारला आहे. हा प्रकल्प उत्तम लोकेशनवर असून हिंजवडी आयटी पार्क, मुंबई-बंगळुरू हायवे आणि आसपासच्या महत्त्वाच्या सुविधांपासून अगदी जवळ आहे. या प्रकल्पातील घरं आधुनिक सोयी-सुविधांसह सुसज्ज असून, कुटुंबासाठी योग्य अशा 1.5 BHK आणि 1 BHK कॉन्फिगरेशनची घरे उपलब्ध आहेत.
घराचे बिल्टअप क्षेत्रफळ 72.01 चौ.मी. आणि कार्पेट क्षेत्र 47.24 चौ.मी म्हणजेच 508 स्क्वेअर फुट इतका आहे. या फ्लॅटची एकूण किंमत 20,70,400 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे, तर लॉटरीसाठी अर्ज करताना अनामत रक्कम (EMD) 20,000 हजार भरावी लागेल. या प्रकल्पात एकूण 65 घरे उपलब्ध असून, प्रकल्पाचा RERA क्रमांक P52100054148 असा आहे. सर्व श्रेणीतील अर्जदारांसाठी (AR, CG, DF, EX, FF, GP, JR, ME, MP/MLA/MLC, NT, PH, SC, SG, ST) ही घरे खुली आहेत.
येथे वाचा – मुंबईत फक्त 15 लाखात म्हाडाचा 1BHK फ्लॅट; जबरदस्त सुविधा, येथे पहा जाहिरात..!
म्हाडाचा 1 BHK फ्लॅट माहिती
येथील 814-A अशीआना निवास, मरुंजी या प्रकल्पातील 1BHK घरांचे बिल्टअप क्षेत्र 49.87 चौ.मी. असून, कार्पेट क्षेत्र 31.92 ते 32.38 चौ.मी. (सुमारे 343 ते 348 चौ.फुट) इतके आहे. घराची एकूण किंमत ₹14,33,800 ठेवण्यात आली असून, अर्ज करताना अनामत रक्कम (EMD) 20,000 रुपये भरावी लागेल. यात 1 BHK ची एकूण 107 घरे उपलब्ध आहेत. प्रकल्पाचा RERA क्रमांक P52100054148 असून, विविध श्रेणीतील अर्जदारांसाठी (AR, CG, DF, DT, EX, FF, GP, JR, ME, MP/MLA/MLC, NT, PH, SC, SG, ST) ही घरे खुली आहेत.
येथे वाचा – मुंबईत फक्त 15 लाखात म्हाडाचा 1BHK फ्लॅट; जबरदस्त सुविधा, येथे पहा जाहिरात..!
या प्रकल्पातील सुविधा
या प्रकल्पात रहिवाशांच्या दैनंदिन गरजा आणि आराम लक्षात घेऊन उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सुरक्षेसाठी CCTV सिक्युरिटीची सोय असून, प्रत्येक टॉवरमध्ये लिफ्ट (Elevator) ची सुविधा आहे. फिटनेस प्रेमींसाठी जॉगिंग ट्रॅक, तर मुलांच्या खेळासाठी खास किड्स प्ले एरिया तयार करण्यात आला आहे. वाहनांसाठी पुरेशी पार्किंग स्पेस, अखंडित वीजेसाठी पॉवर बॅकअप आणि सतत पाणीपुरवठ्याची सुविधा (Regular Water Supply) उपलब्ध आहे. या सर्व सुविधा मिळून हा प्रकल्प आधुनिक, सुरक्षित आणि कुटुंबासाठी आदर्श निवासस्थान बनवतात.
प्रकल्पा पासून महत्त्वाच्या ठिकाणांचे अंतर
या प्रकल्पाचे लोकेशन अत्यंत सोयीस्कर असून पुण्यातील महत्त्वाच्या ठिकाणांपर्यंत सहज पोहोचता येते. म्हाडाच्या या प्रकल्पापासून पुणे रेल्वे स्टेशन 21.8 किमी, विमानतळ 28.4 किमी, स्वारगेट 23.2 किमी आणि शिवाजीनगर बस स्थानक 19.5 किमी अंतरावर आहे. पुणे–मुंबई महामार्ग फक्त 5 किमीवर असल्याने प्रवास सोपा आणि जलद होतो. शिक्षण संस्थांबाबत बोलायचं झालं तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 15.4 किमी, JSPM कॉलेज 7.7 किमी, इंदिरा कॉलेज 6.2 किमी आणि रायझिंग स्टार स्कूल फक्त 3.3 किमी अंतरावर आहे. परिसरात डी मार्ट (6.7 किमी), मणिपाल हॉस्पिटल (10 किमी) आणि हिंजवडी आयटी पार्क (4 किमी) सारख्या सर्व सुविधा उपलब्ध असल्याने हे ठिकाण राहण्यासाठी आणि गुंतवणुकीसाठी अत्यंत आकर्षक ठरते.
येथे वाचा – मुंबईत फक्त 15 लाखात म्हाडाचा 1BHK फ्लॅट; जबरदस्त सुविधा, येथे पहा जाहिरात..!
या घरांसाठी अर्ज कुठे करणार?
814-B अशियाना निवास (MHADA पुणे लॉटरी 2025) योजनेत अर्ज करण्यासाठी https://lottery.mhada.gov.in/OnlineApplication/Pune/ ही पुणे म्हाडा लॉटरीची अधिकृत वेबसाईट आहे.
लॉटरीत घर लागल्यानंतर कधी मिळणार?
814-A व 814-B अशीआना निवास प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याची अपेक्षित तारीख, म्हणजेच ग्राहकांना ताबा (possession) मिळण्याची अधिकृत डेडलाइन, 28 जानेवारी 2029 अशी नमूद करण्यात आलेली आहे. जर तुम्ही तीन वर्षे थांबायला तयार असाल तर या घरांचा विचार नक्की करू शकता.
Apply kuthe karaych
How to apply
I really need a house because I live on rent. Will be good if got a house in area like Vasai-Virar City
Mhada’s give only them house whose are without shelter who need house not for any businessman political personsthough and take right decision
Mumbai madhe pshije kivva thane
Where is the application side
I am applying on Mhada portal since last 15 years but till date my Name is still appears in lottery result. I really don’t know how they are measure lottery results.
I am applying on Mhada lottery portal since last 15 years but till date my name is still not appeared in lottery result. I really don’t know how they are measure lottery results.
Always same error
मी मागे म्हाडा प्रकल्पासाठी लॉटरी साठी apply केले होते
माझा नंबर नाही लागला
आता पुन्हा प्रयत्न करते
मागे मी म्हाडा लॉटरी साठी apply केले होते पण नंबर नाही लागला
आता पुन्हा प्रयत्न करते
Pahilyach veles lawat aahe