BMC Housing Scheme : मुंबईत घर घेणं आज अनेकांच्या आवाक्याबाहेर गेलं असलं, तरीही म्हाडा, सिडको आणि आता थेट बृहन्मुंबई महानगरपालिका देखील नागरिकांसाठी परवडणाऱ्या घरांच्या लॉटऱ्या (Housing Lottery) आणत आहेत. याच पार्श्वभूमीवर बीएमसीच्या 426 घरांच्या लॉटरीने सध्या चांगलीच चर्चा रंगवली आहे. विशेष म्हणजे, ही घरे दक्षिण मुंबईत उपलब्ध असल्याने या योजनेकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे आणि नागरिकांमध्ये उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं आहे. आज पासून या घरांसाठी अर्ज सुरू झाले आहेत. या ठिकाणी आपण या लॉटरीसाठी अर्ज कुठे करायचा? आणि या घरांचे लोकेशन, क्षेत्रफळ, महत्त्वाच्या तारखा आणि किमती अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
मुंबईतील BMC लॉटरीतील घरांचे लोकेशन, क्षेत्रफळ आणि किमती
BMC लॉटरी 2025 अंतर्गत एकूण 426 घरं उपलब्ध करण्यात आली आहेत. शहराच्या विविध भागांत ही घरं आहेत. या घरांच्या किमती जरी 50 लाखांच्या पुढे असल्या तरी तेथील लोकेशन व कनेक्टिव्हिटी पाहता ही घरे परवडणारीच आहे असं म्हणता येईल. काही घरे अत्यल्प गटात आहेत, तर काही घरे अल्प गटातील आहे.
चला, मग जाणून घेऊया या घरांचं लोकेशन, क्षेत्रफळ आणि किंमत.. आणि अर्ज कुठे करावा हे देखील आपण खाली पाहणार आहोत.
(1) भांडुप पश्चिम – एलबीएस मार्ग (अत्यल्प गट) : इथं एकूण 240 घरे उपलब्ध आहेत. येथील घरांचे क्षेत्रफळ साधारण 269 ते 300 चौरस फूट, आणि येथील घरांची किंमत 63 लाख ते 70.85 लाख रुपये या दरम्यान आहे. येथील कनेक्टिव्हिटी पण चांगली आहे.
(2) कांदिवली पूर्व – वाढवन (अत्यल्प गट) : कांदिवलीत फक्त 30 घरे, येथील घरे प्रत्येकी सुमारे 300 चौरस फूट आकाराची असून या घरांच्या किमती 63.77 लाख ते 66.96 लाख यादरम्यान आहे. येथील शांत परिसर आणि उत्तम सोयी-सुविधा हे एक आकर्षण आहे.
येथे वाचा – मुंबईत फक्त 15 लाखात म्हाडाचा 1BHK फ्लॅट; जबरदस्त सुविधा, येथे पहा जाहिरात..!
(3) भायखळा – प्रेस्टिज जासदान (अत्यल्प गट) : इथे 42 घरे आहेत, प्रत्येकी 300 चौरस फूट या क्षेत्रफळाची ही घरे आहेत. येथील घरांच्या किमती 1 कोटी ते 1 कोटी 63 लाख रुपये अशा आहे. ज्या लोकांना लोकेशन प्रायोरिटी आहे, त्यांच्यासाठी ही संधी एकदम मस्त आहे. फक्त येथील घरांच्या किमती थोड्या जास्त आहे.
(4) कांजुरमार्ग (अल्प गट) : या परिसरात 27 घरे आहेत, प्रत्येकी 489 चौरस फूट आकाराची. किंमत 97 लाख ते 1 कोटी 7 लाख रुपये. येथे रेल्वे, बस, मेट्रो सगळं अगदी जवळ आहे. येथून कामाच्या ठिकाणी येणं-जाणं सोपं आहे.
(5) अंधेरी पूर्व – मरोळ (अल्प गट) : मरोळमध्ये एकूण 14 घरे आहेत, या घरांचे क्षेत्रफळ 398 ते 484 चौरस फूट इतके आहे. या घरांच्या किमती 78 लाख ते 95 लाख 49 हजार रुपये अशा आहेत.
(6) जोगेश्वरी पूर्व – मजास गाव (अत्यल्प गट) : इथे 46 घरे आहेत, या घरांचे क्षेत्रफळ 281 ते 283 चौरस फूट इतकी आहे. या घरांची किंमत किंमत 54 ते 57 लाख रुपये यादरम्यान आहे.
(7) गोरेगाव पश्चिम – पिरामल नगर (अत्यल्प गट) : या ठिकाणी 19 घरे उपलब्ध झाली असून प्रत्येकी 282 चौरस फुटाची ही घरे आहेत. या घरांची किंमत 59 लाख 15 हजार रुपये अशी आहे. मध्यमवर्गीयांसाठी मुंबईतलं घर या किंमतीत मिळणं म्हणजे खूपच फायदेशीरच म्हटलं जाईल.
(8) सागर वैभव सोसायटी, दहिसर (अत्यल्प गट) : या ठिकाणी फक्त 4 घरे असून ही घरे 292 चौरस फूट आकाराची आहे. येथील घरांची किंमत 66 लाख रुपये एवढी आहे.
येथे वाचा – म्हाडाचा 1.5 BHK फ्लॅट प्रशस्त बाल्कनीसह, अर्ज भरणे सुरू.. घर लागण्याची संधी जास्त!
BMC लॉटरीच्या महत्वाच्या तारखा
BMCच्या घरांच्या लॉटरीसाठी अर्ज प्रक्रिया 16 ऑक्टोबर 2025 म्हणजेच आज सकाळी 10 वाजल्यापासून ऑनलाइन सुरू झाली आहे. इच्छुकांना 14 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याची संधी मिळणार आहे. अर्ज शुल्क आणि अनामत रक्कम भरण्याची अंतिम मुदत त्याच दिवशी रात्री 11.59 वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. त्यानंतर पात्र अर्जदारांची अंतिम यादी 18 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता प्रसिद्ध होईल. लॉटरीची सोडत 20 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता पार पडेल, तर यशस्वी आणि प्रतीक्षा यादीतील अर्जदारांची नावे 21 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता अधिकृत संकेतस्थळावर पाहायला मिळतील.
येथे वाचा – मुंबईत फक्त 15 लाखात म्हाडाचा 1BHK फ्लॅट; जबरदस्त सुविधा, येथे पहा जाहिरात..!
लॉटरीतील घरांसाठी अर्ज कुठे करावा?
मुंबई महानगरपालिकेच्या घरांसाठी आज सकाळी वाजल्यापासून अर्ज प्रक्रिया आता ऑनलाइन सुरू झाली आहे. आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली ही सोडत पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पाडली जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. या योजनेअंतर्गत अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घरे उपलब्ध करून देण्यात येत आहेत, ज्यामुळे अनेकांच्या ‘स्वतःच्या घराचे स्वप्न’ या दिवाळीत साकार होऊ शकेल. इच्छुक अर्जदारांनी आपले अर्ज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://bmchomes.mcgm.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भरावेत.
रूपा गोरख कांबळे मी पुण्या राहते घर भाड्याने 20 वर्षे झाले.मि.घरकाम.करते.जाते.मुलगा शाळेत जातो आणि मला. मी .एकटी काम करते.नवरा शेकुटी काम करता मधुन विनंती आहे की अर्ज करण्याची विनंती आहे घरांसाठी विनंती आहे.. अर्जदाराची सही रूपा गोरख कांबळे..
gharachi kimat khup aahe
30 हजार पगार असणाऱ्याला ही एवढी महाग घर कसे परवडेल ,
मुंईकरांसाठी म्हडा ची घर छान आनंदाची बातमी आहे. पण महाराष्ट्र शासनानी महाराष्ट्रातील सेवा निवृत्त कर्मचारी यांचाही विचार करावा या काही कर्मचारी वर्गाला अजून स्व ता चे घर नाही आणि घेता आले नाही. अशा वयस्कर कर्मचाऱ्यां बाबत विचार करावा. घराच्या किमतीत सवलत मिळावी, सरकारी सेवा निरुत्त कर्मचारी सध्या भाड्याचे घरात रहात आहेत. यांचा विचार मा. मुखमंत्री साहेब यांनी जरूर करावा. हिच सेवानिवृत कर्मचारी यांची मागणी आहे.
मुंईकरांसाठी म्हडा ची घर छान आनंदाची बातमी आहे. पण महाराष्ट्र शासनानी महाराष्ट्रातील सेवा निवृत्त कर्मचारी यांचाही विचार करावा या काही कर्मचारी वर्गाला अजून स्व ता चे घर नाही आणि घेता आले नाही. अशा वयस्कर कर्मचाऱ्यां बाबत विचार करावा. घराच्या किमतीत सवलत मिळावी, सरकारी सेवा निरुत्त कर्मचारी सध्या भाड्याचे घरात रहात आहेत. यांचा विचार मा. मुखमंत्री साहेब यांनी जरूर करावा. हिच सेवानिवृत कर्मचारी यांची मागणी आहे.
gharachi kimat khup aahe
घराची किंमत खुप आहे. अत्यल्प ऊत्पन्न
गटासाठी सवलत मिळायला हवी.