दिवाळीची ऑफर! फक्त 1 रुपयात इंटरनेट, कॉलिंग महिनाभर फ्री… त्वरा करा, ऑफर सोडू नका..!

Diwali Dhamaka Offer : या दिवाळीत आनंद दुप्पट होणार आहे, कारण फक्त 1 रुपयात मिळणार आहे महिनाभर फ्री इंटरनेट आणि अनलिमिटेड कॉलिंग..  होय, ही बातमी खरी आहे. एका मोठ्या टेलिकॉम कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी ही खास दिवाळी ऑफर जाहीर केली आहे. फक्त एक रुपयात तुम्ही महिनाभर नेट आणि कॉलिंगचा आनंद घेऊ शकता.
ही भन्नाट ऑफर नेमकी कोणत्या कंपनीने दिली आहे आणि कशी मिळेल याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया..

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बीएसएनएलने आपल्या नवीन ग्राहकांसाठी भन्नाट गिफ्ट आणलं आहे. ‘दिवाळी बोनान्झा योजना’ अंतर्गत कंपनी फक्त १ रुपयात संपूर्ण महिनाभराची मोफत 4G सेवा देणार आहे. या योजनेत कॉलिंग, डेटा आणि एसएमएस — सगळंच पूर्णपणे फ्री मिळणार आहे. भारत सरकारची ही टेलिकॉम कंपनी सांगते की, ही ऑफर १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान उपलब्ध असेल. बीएसएनएलचं उद्दिष्ट एकच — अधिकाधिक लोकांनी त्यांचं नवं 4G नेटवर्क वापरून त्याचा वेग आणि सुविधा अनुभवाव्यात.

येथे वाचा – खुशखबर! घरांची लॉटरी जाहीर, आजपासून अर्ज सुरू, इथे करा अर्ज..!

या दिवाळीत बीएसएनएलच्या या योजनेत ग्राहकांना मिळणार आहेत जबरदस्त फायदे.. या प्लॅनसाठी अतिरिक्त शुल्काची गरज नाही, फक्त १ रुपयाची टोकन फी भरून आणि KYC प्रक्रिया पूर्ण करून तुम्ही ही ऑफर सक्रिय करू शकता. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी जवळच्या बीएसएनएल ग्राहक सेवा केंद्राला भेट द्यावी लागेल. प्रक्रिया अगदी सोपी आहे —
(1)  तुमची KYC कागदपत्रं घेऊन CSE ऑफिसला जा,
(2) “Diwali Bonanza Plan”ची विनंती करा,
(3) KYC पूर्ण करा आणि फ्री सिम कार्ड घ्या,
(4) सिम अॅक्टिव्ह केल्यावर ३० दिवसांची मोफत 4G सेवा आपोआप सुरू होईल.

या ऑफरअंतर्गत ग्राहकांना ३० दिवसांची संपूर्ण वैधता मिळणार आहे.  या कालावधीत अनलिमिटेड कॉलिंग, दररोज २ जीबी डेटा, आणि १०० मोफत एसएमएस अशी आकर्षक सुविधा दिली जाईल. सर्वात खास म्हणजे हे सिम पूर्णपणे मोफत असून, फक्त १ रुपयाचा टोकन अॅक्टिव्हेशन चार्ज भरावा लागेल. जर कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल, तर ग्राहक १८००-१८०-१५०३ या हेल्पलाइनवर संपर्क साधू शकतात किंवा bsnl.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अधिक माहिती मिळवू शकतात.

येथे वाचा – मुंबईत फक्त 15 लाखात म्हाडाचा 1BHK फ्लॅट; जबरदस्त सुविधा, येथे पहा जाहिरात..!

‘मेक इन इंडिया’च्या शक्तीवर बीएसएनएलचा विश्वास.. बीएसएनएलचे सीएमडी ए. रॉबर्ट जे. रवी यांनी सांगितलं की, कंपनीनं देशभरात अत्याधुनिक 4G नेटवर्क उभारलं आहे, जे पूर्णपणे ‘मेक इन इंडिया’ तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या दिवाळी ऑफरमुळे लोकांना बीएसएनएलच्या या नव्या नेटवर्कचा वेग, गुणवत्ता आणि कव्हरेज अनुभवण्याची अनोखी संधी मिळेल. “बीएसएनएलचं ध्येय केवळ परवडणाऱ्या सेवा देणं नाही, तर भारताच्या प्रत्येक नागरिकाला आत्मनिर्भर डिजिटल नेटवर्कशी जोडणं हे आहे,” असं रवी यांनी नमूद केलं.

1 thought on “दिवाळीची ऑफर! फक्त 1 रुपयात इंटरनेट, कॉलिंग महिनाभर फ्री… त्वरा करा, ऑफर सोडू नका..!”

Leave a Comment

Join WhatsApp Group