खुशखबर! या लोकांना लागली म्हाडाची लॉटरी, येथे पहा यादी..!

MHADA Lottery Winner List : बऱ्याच दिवसांपासून म्हाडा लॉटरीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहिली जात होती. आज शेवटी म्हाडा लॉटरीचा निकाल जाहीर झाला आहे. अनेकांना म्हाडाची घरे लागली आहेत. त्यामुळे अनेकांच्या डोळ्यातील घराचं स्वप्न आज प्रत्यक्षात उतरलं आहे. हजारो अर्जदारांपैकी काहींचं नशीब खुललंय आणि त्यांना परवडणाऱ्या दरात स्वतःचं घर (Affordable flat) मिळालं आहे. तुमचं नाव या विजेत्यांच्या यादीत आहे का? हे पाहण्यासाठी आपण खाली यादी दिलेली आहे. 

आज सर्वसामान्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न खरोखरच साकार झाले आहे. म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे 5354 घरं आणि 77 भूखंडांच्या विक्रीसाठी ठाणे पश्चिम येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संगणकीय सोडत पार पडली. निकाल जाहीर होताच भाग्यवान विजेत्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद खरंच पाहण्यासारखा होता. आज म्हाडामुळे अनेकांना त्यांचा हक्काचा निवारा मिळाला आहे.

येथे वाचा – म्हाडाची जाहिरात आली; आता फक्त 18 लाखात घर, पहा घरांचे लोकेशन..!

या भव्य सोडत कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, मुंबई व कोकण मंडळातील अधिकारी रेवती गायकर, वंदना सूर्यवंशी आणि उमेश वाघ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे आणि इतर अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

येथे पहा – दिवाळीत घ्या म्हाडाचे घर; दोनशे घरांची संधी, म्हाडाचा दिवाळी स्पेशल सेल..!

येथे पहा विजेत्यांची यादी

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या Konkan MHADA Lottery 2025 ची विजेत्यांची यादी जाहीर झाली आहे. ही यादी पाहण्यासाठी समोरील म्हाडाच्या अधिकृत लिंक वर क्लिक करा. https://www.mhada.gov.in/sites/default/files/KB_25_03-Konkan_MHADA_TENEMENTS-dtd-11-10-2025.pdf

1 thought on “खुशखबर! या लोकांना लागली म्हाडाची लॉटरी, येथे पहा यादी..!”

  1. किंमत किती,, व मुंबई मध्ये कुठे आहे,, घर,,, जागा किती,, ते सांगा

    Reply

Leave a Comment

Join WhatsApp Group